जवखेडे खालसा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

जवखेडे खालसा येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

मिरी: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा ग्रामपंचायत, श्री कानिफनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाला सरपंच चारुदत्त वाघ उपसरपंच नितीन जाधव, पै.अमोल गवळी, राजेश भोसले,सुदर्शन सरगड आदींसह शिक्षकवृंद, विद्यार्थी आणि परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी सरपंच चारुदत्त वाघ यांनी महिलांना शासकीय योजना आणि बचत गटांचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. ग्रामपंचायत सदस्या सुनिताताई वाघ यांनी विद्यार्थिनी व महिलांना आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच शिक्षिका ससाणे मॅडम यांनी महिलांच्या सुरक्षिततेसह आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.संदीप मचे यांनी केले तर आभार ज्येष्ठ कलाशिक्षक ससाणे सर यांनी मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें