महिलांच्या अधिकारांचे मुळ त्यांच्या आर्थिक स्वावलंबनात आहे-प्राचार्य डॉ. बबन चौरे

महिलांच्या अधिकारांचे मुळ त्यांच्या आर्थिक स्वावलंबनात आहे-प्राचार्य डॉ. बबन चौरे

बाबूजी आव्हाड महाविद्यालयात महिला दिन साजरा

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
ग्रामीण भागात आजही पुरुषी मानसिकता प्रकर्षाने जाणवते. संविधानाने स्री पुरुष भेद नष्ट केला असला तरीही महिलांना मुख्य प्रवाहापासून आजही दूर ठेवले जाते. महिलांना आपल्या अधिकारारांचा वापर करून समाजात सन्मानाने जगायचे असेल तर त्यांनी आर्थिक स्वावलंबन प्राप्त करायला हवे, असे प्रतिपादन येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांनी केले. ते महाविद्यालयात आयोजित महिला दिन कार्यक्रमात बोलत होते.

व्यासपीठावर सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. अशोक डोळस, डॉ. वैशाली आहेर, ग्रंथपाल डॉ. किरण गुलदगड, डॉ. अभिमन्यू ढोरमारे, डॉ. प्रशांत साळवे, डॉ. अजयकुमार पालवे, प्रा. ब्रम्हानंद दराडे उपस्थित होते.
डॉ. चौरे म्हणाले, आज महिलांसाठी कोणतेही क्षेत्र वर्ज्य नाही हे त्यांनी स्वकर्तुत्वाने सिद्ध केले आहे.त्या पुरुषांच्या बरोबरीने आज काम करतांना दिसतात. महिलांचा आदर करणे ही केवळ एक परंपरा किंवा औपचारिकता नाही तर समाजाच्या प्रगती आणि विकासाचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे. त्यामुळेच दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. या दिवशी महिलांच्या सामाजिक प्रगतीचं कौतुक केलं जातं आणि त्यांना आणखी प्रगतीसाठी आणि नवनवीन उंची गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम ‘अ‍ॅक्सिलरेट अ‍ॅक्शन’ आहे, जी महिलांच्या प्रगतीला सकारात्मक प्रोत्साहन देणाऱ्या धोरणे, संसाधने आणि कृती ओळखण्याचे तसेच त्यांच्या अंमलबजावणीला पाठिंबा देण्याचे आणि ती वाढवण्याचे जागतिक आवाहन आहे. पुढील पिढीतील तरुणांना, विशेषतः तरुणी आणि किशोरवयीन मुलींना दीर्घकालीन बदल घडवून आणणारे घटक बनण्यास शिकवणे हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, असे ते शेवटी म्हणाले.यानिमित्ताने महाविद्यालयातील सर्व महिला शिक्षिकांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वैशाली आहेर, सुत्रसंचालन डॉ. अशोक डोळस तर आभार प्रा. सुरेखा चेमटे यांनी मानले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें