अमोल जाधव यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान 

अमोल जाधव यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान 

मिरी: पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील नवोदित कवी अमोल अरविंद जाधव यांना नुकताच युवा महाराष्ट्र फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणारा यंदाचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
    साहित्य क्षेत्रात व्यसनमुक्ती या विषयावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जाधव यांना हा पुरस्कार देण्यात आला असून सन्मानचिन्ह, पदक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्काराचे वितरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गणेश आचार्य यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
   अमोल जाधव हे सध्या संविधान रक्षक सेना या संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून देखील काम पाहतात या माध्यमातून सामाजिक कार्य देखील करत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल जवखेडे खालसा परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें