माणिकदौंडी परिसरातील बिबट्या पकडण्यासाठी उपाययोजना करा-अविनाश पालवे

माणिकदौंडी परिसरातील बिबट्या पकडण्यासाठी उपाययोजना करा-अविनाश पालवे

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण: 

तालुक्यातील माणिकदौंडी परिसर हा डोंगराळ भाग असून या भागामध्ये वन्यजीवांचे वास्तव्य जास्त प्रमाणात असून नागरिकांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. लांडकवाडी येथे बाबासाहेब गर्जे यांच्या घरासमोरील पाळीव कुत्र्याची शिकार बिबट्याने केली आहे. तरी या परिसरामध्ये वन विभागाने तात्काळ बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सरपंच अविनाश पालवे यांनी वनपरिक्षेत्राधिकारी अरुण साबळे यांच्याकडे केली आहे.

तीन वर्षांपूर्वी मढी, करडवाडी, केळवंडी या ठिकाणी नरभक्षेत बिबट्याने लहान मुलांवर हल्ला करून ठार केले होते. अशा कुठल्याही घटना घडू नये, कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना वनविभागाने कराव्यात व पथकाद्वारे गस्त घालत राहावी, असेही चर्चेदरम्यान पालवे यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

यावर वनपाल बबन मंचरे व वनपरिक्षेत्राधिकारी अरुण साबळे यांनी आम्ही तात्काळ उपायोजना करतो, असे सांगितले व लांडकवाडी येथे अधिकाऱ्यांना तात्काळ पाठवून दिले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें