कै.तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलचे स्नेहसंमेलन उत्साहात
मिरी: नेवासा तालुक्यातील माका येथील गुणवत्ता ,संस्कार व संस्कृती जपणारी शाळा म्हणून अल्पावधीत लौकिक मिळविलेल्या कै.तात्याबा बनसोडे इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी निवृत्त प्राचार्य रवींद्र गावडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण पांढरे, खंडू भाऊ लोंढे, सरपंच अनिल घुले, देडगावचे सरपंच चंद्रकांत मुंगसे, बाळासाहेब मुंगसे, युवा नेते सहदेव लोंढे , प्राचार्य स्वरूपचंद गायकवाड ,प्राचार्य वसंत घुले भगवान सानप ,म्हातारदेव सोलाट, मनोहर बनसोडे, संजय गाडे, सुदाम घुले ,अशोक वाघमोडे मल्हारी आखाडे ,गोकुळ लोंढे,संतोष नन्नवरे,भाऊसाहेब सावंत, किशोर मुंगसे,मच्छिंद्र लोंढे, बाळासाहेब मदने आदी मान्यवर उपस्थित होते .
सदर कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी, कोळीगीत ,लुंगी डान्स, शेतकरी गीत ,नाटिका आदिवासी गीत ,लावणी या गीतावर सदाबहार नृत्य करत प्रेक्षकांची मने जिंकली. सदर कार्यक्रमास माका ,पाचुंदा, देडगाव ,आडगाव, मिरी ,महालक्ष्मी हिवरे ,शिंगवे येथील ग्रामस्थ व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक देडगाव सोसायटीचे चेअरमन तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.सागर बनसोडे यांनी केले.सूत्रसंचालन युनुस पठाण यांनी केले तर आभार संचालिका मीना बनसोडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या संचालिका मीना बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षिका मनीषा काळे, सविता गावडे , श्रुती बनसोडे, जयश्री पटेकर ,सोनाली बर्फे आदींनी परिश्रम घेतले.