पांढरीपुल–शेवगाव रस्त्यावरील अतिक्रमणांवर होणार धडक कारवाई

पांढरीपुल–शेवगाव रस्त्यावरील अतिक्रमणांवर होणार धडक कारवाई

६ मार्च रोजी काढले जाणार मिरी येथील अतिक्रमण

मिरी: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील येणाऱ्या अनेक रस्त्यांच्या कडेला अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अतिक्रमण निर्मूलनासाठी प्रशासनाकडून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली असून सदर बैठकीत जिल्ह्यातील रस्त्यांवरील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या कारवाईसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस विभाग व महसूल विभाग संयुक्तपणे कार्यवाही करणार असल्याने अतिक्रमण कोणत्याही परिस्थितीत काढले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पांढरीपुल–शेवगाव रस्त्यावर असणाऱ्या खोसपुरी, पांगरमल,शिंगवे केशव,मिरी, माका, निंबेनांदूर, ढोरजळगाव आदींसह सर्वच गावच्या हद्दीत येणाऱ्या या रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला १५ मीटर पर्यंतची जागा अतिक्रमणमुक्त केली जाणार आहे.महसूल, पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या संयुक्त पथकाकडून येत्या ६ मार्च रोजी सदरची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे. तत्पूर्वी संबंधित अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा प्रशासनाकडून पोलिस बंदोबस्तात सदरचे अतिक्रमण काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे वाहतुकीला अडथळा ठरणारी व नियमबाह्य सर्वच अतिक्रमणे हटवली जाणार आहेत.

मिरी येथील अतिक्रमणांवर ६ मार्च ला होणार कारवाई 

वरिष्ठांच्या आदेशानुसार पांढरीपुल ते शेवगाव रस्त्यावरील मिरी येथील सर्व अनधिकृत अतिक्रमणे येत्या ६ मार्च रोजी हटविली जाणार असल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मिरी ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे.त्यामुळे संबंधित अतिक्रमण धारकांनी आर्थिक नुकसान टाळण्यासाठी लवकरात लवकर आपले नियमबाह्य अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे अन्यथा पोलीस बंदोबस्तात सदर अतिक्रमणे काढली जाणार आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करून सहकार्य करावे.

– वसंत बडे (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग,पाथर्डी)

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें