तहसिलदार व गट विकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार मिरी ग्रामपंचायत कडून विनापरवाना अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीसा

मिरी ग्रामपंचायत कडून विनापरवाना अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस

तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्या सूचनेनुसार कारवाई

मिरी: पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील अतिक्रमणांचा प्रश्न चिघळत असतानाच मिरी ग्रामपंचायतीने विनापरवाना अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार, संबंधितांना नोटीस देण्यात आली असून अतिक्रमण तत्काळ हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शासनाच्या निर्देशानुसार संपूर्ण जिल्ह्यात रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यानुसार मिरी येथील व्यवसायिकांनी रस्त्याच्या कडेला असलेले आपले अतिक्रमण काढून घेतले परंतु मिरी बाजार तळावर अतिक्रमण केले. त्याची माहिती मिळताच पाथर्डी चे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी मिरी ग्रामपंचायतीला या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या.

त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयातर्फे संबंधित अतिक्रमणधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत.संबंधितांनी शासनाच्या गट नंबर १६५ मधील जागेवर कोणतीही पूर्वसूचना न देता अनधिकृतपणे अतिक्रमण केले आहे. त्यामुळे संबंधितांनी पत्र मिळाल्यानंतर त्वरित अतिक्रमण हटवावे, अन्यथा पुढील वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा सदर नोटीस मध्ये देण्यात आला आहे.

मिरीमध्ये अतिक्रमणाचा प्रश्न गंभीर बनला असतानाच, स्थानिक प्रशासनाने कठोर कारवाई सुरू केली आहे. मात्र, ही कारवाई कितपत प्रभावी ठरते आणि भविष्यात अतिक्रमण पूर्णतः रोखले जाते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सोशल मीडियावर चर्चाना उधाण:

मिरी येथील अतिक्रमणा संदर्भात सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून, बहुतेकांनी व्यवसायिकांच्या उदरनिर्वाहाचा विचार करून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तर काहींनी मात्र बाजारतळावर अतिक्रमण न करता मध्यवर्ती ठिकाणी असलेली बाजारतळाची संपूर्ण जागा रिकामी करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें