मिरी येथील श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थानच्या गुढीपाडवा यात्रा उत्सवाची जय्यत तयारी
मिरी: पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थान येथे गुढीपाडवा यात्रा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने विविध धार्मिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण पंचक्रोशीतील भाविक या उत्सवासाठी मोठ्या संख्येने आवर्जुन उपस्थित राहतात.
यात्रा उत्सव काळात शनिवारी भट्टी पेटविण्याचा कार्यक्रम झाला असून मंगळवारी देवाला तेल लावणे,रविवार दि.९ रोजी दशमी उत्सव,गुरुवार दि १३ रोजी होळी उत्सव,बुधवार दि १९ रोजी कानिफनाथ समाधी उत्सव,बुधवार दि.२६ रोजी मिरी येथून कावड प्रस्थान,शनिवार दि.२९ रोजी कावड मिरवणूक व सरतेशेवटी रविवार दि.३० रोजी मुख्य गुढीपाडवा उत्सव होणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी महाअभिषेक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, सर्व भक्तांनी या सोहळ्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री चैतन्य कानिफनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.