पद्मभूषण कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणजे मराठी राजभाषा दिन-डॉ. एम. एस. तांबोळी
दादापाटील राजळे महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण: मराठी विभाग व दादापाटील राजळे कला व विज्ञान महाविद्यालय आदिनाथनगर ता .पाथर्डी जि .अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने २७ फेब्रुवारी रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिन म्हणून घोषित केला, असे गौरव उद्गार कला शाखाप्रमुख डॉ . एम .एस .तांबोळी यांनी काढले.
या कार्यक्रम प्रसंगी मराठी प्रमुख प्रा .डॉ .जालिंदर कानडे यांनी मराठी राजभाषा दिनाचे महत्त्व सांगताना म्हटले की,या दिवशी साहित्यातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे जेष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म झाला होता .कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत.कवी कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना स्मरण म्हणून मराठी राजभाषा दिवस २७ फेब्रुवारी म्हणजेच त्यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने आपले काव्य लेखन केले.त्यांना आपल्या प्रभावी साहित्यामुळे ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांना आत्मनिष्ठ आणि समाजनिष्ठ जाणीव असणारे लेखक मानले जाते. त्यांच्या नटसम्राट,वीज म्हणाली धरतीला या नाटकांना ज्ञानपीठ आणि पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.याशिवाय अक्षरबाग ,विशाखा,किनारा,मराठी माती, प्रवासी पक्षी,जीवन लहरी इत्यादी त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रह आहेत .
मराठी राजभाषा दिनानिमित्त कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर, कार्यालयीन अधिक्षक श्री विक्रम राजळे ,विज्ञान शाखाप्रमुख डॉ .जे .एन .नेहुल ,डॉ. गंगाधर लवांडे, डॉ. एस जे देशमुख, नॅक समन्वयक डॉ.राजू घोलप, डॉ . साधना म्हस्के, डॉ. निर्मला काकडे, डॉ .एस. आर भराटे, डॉ. राजकुमार घुले, प्रा .अनिता पाटोळे, प्राध्यापिका भराट, डॉ .के .जी. गायकवाड ,डॉ.आसाराम देसाई ,डॉ. रोहित आदलिंग ,डॉ . व्ही .बी .बनसोडे, प्रा. संदीप कवळे, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ .सी. पी. काळे यांनी केले तर वाङ् मय मंडळ प्रमुख डॉ. एस. बी. देशमुख यांनी आभार मानले.