तालुकास्तरीय विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात

तालुकास्तरीय विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा उत्साहात

पहिली ते चौथीच्या वर्गातील ४८४ विद्यार्थ्यांचा सहभाग

परीक्षेचे सुसज्ज नियोजन पाहून पालक समाधानी

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण: 

शहरातील पार्थ विद्या प्रसारक मंडळ पाथर्डी संचलित तालुकास्तरीय विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा नुकतीच विवेकानंद विद्यालयात उत्साहात व आनंददायी वातावरणात संपन्न झाली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर विकसित व्हावा, या दृष्टिकोनातून पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या संकल्पनेतून विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षा दरवर्षी घेण्यात येत आहे. संस्थेने घेतली जाणारी या परीक्षेचे पाचवे वर्ष आहे. संस्थेचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या तसेच संस्थेचे सध्या हीरक महोत्सव वर्ष सुरू असल्याने विद्यार्थ्यांसाठी पुढील काळात विविध बौद्धिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत, असे सांगितले. यावर्षी इयत्ता पहिली ते चौथी या वर्गांसाठी एकूण ४८४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर स्पर्धा परीक्षा नियोजनबद्ध व आनंददायी वातावरणात घेण्यात आली. परीक्षेचे सुसज्ज नियोजन पाहून पालकांनी समाधान व्यक्त केले.

विवेकानंद प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करून गुणवत्ता यादी जाहीर केली जाईल. शहरी विभागातून प्रथम पाच विद्यार्थी तर ग्रामीण विभागातून प्रथम तीन विद्यार्थी निवडले जातील. गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव केला जाणार आहे.

स्पर्धा परीक्षेसाठी ज्ञानेश्वर गायके,अनुजा कुलकर्णी,संपत घारे,जयश्री एकशिंगे,मनीषा गायके, आशा बांदल, राधिका सरोदे, ज्योती हंपे, किर्ती दगडखैर, विद्या घोडके यांनी कामकाज पाहिले तर परीक्षेचे पर्यवेक्षण कामकाज करण्यासाठी माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर बंधू – भगिनी यांनी परिश्रम घेतले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें