मांजरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
मांजरी(प्रतिनिधी: किशोर बाचकर)
मांजरी येथील ग्रामदैवत स्वामी श्री चंद्रगिरी महाराज मंदिर परिसरात अखंड हरिनाम सप्ताह शुक्रवार दिनांक २१/०२/२०२५ ते शुक्रवार दिनांक २८/०२/२०२५ दरम्यान होत आहे. विशेष म्हणजे या सप्ताहास ३६ वर्षांची अखंड परंपरा आहे.
या निमित्त मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या सप्ताहात दररोज सकाळी ४ ते ६ काकडा भजन, ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ, तसेच रात्री ७ ते ९ वाजता कीर्तन सोहळा होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तसेच शुक्रवार दिनांक २८/०२/२०२५ रोजी सकाळी ९ ते ११ वा. गुरुवर्य ह.भ.प. शांतीब्रम्ह भास्करगिरीजी महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तरी
भाविक भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे श्री चंद्रगिरी महाराज भजनी मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे