भालेश्वर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
तालुक्यातील भालगाव येथील भालेश्वर हायस्कूल भालगाव या विद्यालयाचा इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.हनुमान गोर्डे हे होते. यावेळी व्यासपीठावर समन्वयक श्री. दिगंबर नजन, ज्येष्ठ शिक्षक श्री सोनवणे श्रीकांत हे होते.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ग्रा. पं. सदस्य श्री. बाळासाहेब खेडकर, पालक श्री. रामनाथ सुपेकर, श्री. बाबुराव ढिसले यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मुख्याध्यापक गोर्डे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अंगी मेहनत, कष्ट,चिकाटी,जिद्द असल्याशिवाय आपले ध्येय गाठता येत नाही.विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून पुढील जीवनामध्ये आदर्श व्यक्तिमत्त्व घडवून देशाची व समाजाची सेवा करावी, असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. सोनवणे श्रीकांत यांनी ‘दहावीच्या परीक्षेला सामोरे जातांना’ या विषयावर अतिशय अनमोल असे मार्गदर्शन केले. तसेच समन्वयक श्री. दिगंबर नजन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी ग्रा. पं. सदस्य श्री. बाळासाहेब खेडकर यांनी सर्व गुरुजणांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यांनी ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करुन दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.श्री. बर्डे बाबासाहेब व समन्वयक श्री. नजन दिगंबर यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास श्रीम.भालेराव, श्रीम. आढाव, श्री.भाऊसाहेब शिंदे, श्री. बैरागी अरुण, श्री. प्रविण पाचंग तसेच सुनिलमामा जाधव, बंडूआबा सुपेकर तसेच विद्यालयातील शिक्षक- शिक्षकेतर आणि सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. इयत्ता दहावीच्या विद्यार्थी, विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी इयत्ता दहावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विद्यालातील सर्व कर्मचाऱ्यांचा श्रीफळ, गुलाब पुष्प व पेन देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. दुर्गा सुपेकर व कु.संतोषी जायभाये यांनी केले तर आभार कु.ऋतुजा गिऱ्हे हिने मानले.