राष्ट्रीय काणसा वारणा फाउंडेशन लातूर जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर

राष्ट्रीय काणसा वारणा फाउंडेशन लातूर जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर

किसन ढोबळे युवा अध्यक्ष तर उपाध्यक्ष सतिश कराड

पाथर्डी प्रतिनिधी (राजेंद्र चव्हाण):  काणसा वारणा फाउंडेशनचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गोल्डमॅन जनसेवक श्री दीपक दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा जिल्हाध्यक्ष अ.नगर काणसा वारणा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य गोकुळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कानसा वारणा फाउंडेशन राष्ट्रीय लातूर जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असल्याची माहिती माणिकदौंडी येथील अहिल्यानगर युवा जिल्हाध्यक्ष गोकुळ आंधळे यांनी दिली.

कार्यक्रम कानसा वारणा फाउंडेशन ऑफिस कर्जत (रायगड) या ठिकाणी संपन्न झाला. कानसा वारणा फाउंडेशनची लातूर जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी पुढील प्रमाणे- यामध्ये किशन काशिनाथ ढोबळे युवा जिल्हा अध्यक्ष लातूर, सतीश विठ्ठल कराड युवा उपाध्यक्ष लातूर जिल्हा, विशाल महादेव चंद्रपाटले लातूर शहर प्रमुख, अल्पेश उत्तम नागरगोजे लातूर जिल्हा प्रमुख (ग्रामीण), आकाश राजेंद्र चिल्लरगे सचिव लातूर जिल्हा, कानसा वारणा फाउंडेशन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गोल्डमॅन जनसेवक श्री. दिपक दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच युवा जिल्हाध्यक्ष अ.नगर गोकुळ आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवड करण्यात आली.

तसेच सर्व नवनियुक्त पदधिकारी हे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. यांच्या सामाजिक कार्याचा अभ्यास करून निवड करण्यात आली. नवनियुक्त पदधिकारी यांना विविध पदाची धुरा देण्यात आली. काणसा वारणा फाउंडेशन राष्ट्रीय सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच राजकीय चळवळीचे मुक्त व्यासपीठ म्हणून ओळखले जाते.नवनियुक्त पदधिकारी यांच्या कार्याने कानसा वारणा फाउंडेशन राष्ट्रीय हे नाव लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जाईल. येत्या काळात लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात फाउंडेशनचा दबदबा निर्माण करू, यावेळी बोलताना युवा जिल्हाध्यक्ष अ.नगर गोकुळ आंधळे यांनी विश्वास व्यक्त केला.

कांनसा वारणा फाउंडेशनचे काम महाराष्ट्रभर चालत आहे तसेच इतर ही राज्यात काम चालू आहे. तरुणांना संघटित करून चागंला महाराष्ट्र घडवूया शिक्षीत व निर्व्यसनी पिढि घडवूया. अंधश्रद्धा निर्मूलन व व्यसनमुक्त महाराष्ट्र घडवूया सर्वांना मान-सन्मान द्या. पोलीस मित्र म्हणून जनतेची सेवा करूया समाजात अभिमान वाटेल, असे तरूण घडवूया, असे संस्थापक अध्यक्ष श्री.दिपक दादा पाटील यांनी सांगितले. यावेळी काणसा वारणा फाउंडेशनचे पदधिकारी उपस्थित होते. नवनियुक्त पदधिकारी यांचे विविध स्तरावर अभिनंदन होत आहे

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें