पुन्हा झालेले अतिक्रमण काढण्यासाठी मुख्याधिकारी रस्त्यावर
पाथर्डी : शहरातील अतिक्रमण काढण्याची मोहीम ३० जानेवारी पासून सुरु केली. ही मोहीम अधून मधून सुरू असून शुक्रवारी पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे हे रस्त्यावर उतरून पुन्हा झालेले अतिक्रमण काढायला सुरुवात केली.छोटे मोठे व्यावसायिक रस्ता अडून अतिक्रमण करत असल्याने पालिकेच्या अतिक्रमण विभागाने शुक्रवारी सकाळपासून छोटे मोठे व्यवसायिकांना हटवण्यास सुरुवात केली आहे.
येत्या काळात हे अतिक्रमण काढण्याची मोहीम तीव्र होणारा असून अनेक पक्के बांधकाम पाडले जाणार आहेत. मागील महिन्यात महसूल, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग, नगरपरिषद व पोलीस विभाग यांनी सुरू केलेली अतिक्रमणाची मोहीम येणाऱ्या काळात अधिक मोठी असणार आहे. अनेक पक्की बांधकामे तालुका प्रशासनाच्या रडारवर असून अजूनही काही ठिकाणी बाकी असलेले अतिक्रमण काढले जाणार आहे. त्यासाठी तालुका प्रशासनाने विशेष मोहिमा आखली आहे.
पाथर्डी शहरातील मुख्य बाजारपेठेतील असलेले व वाहतुकीला अडथळा ठरणारे फलक हटवले जाणार आहे. त्याचप्रमाणे पक्की झालेली बांधकामे ते सुद्धा लवकरच त्यावरती हातोडा अतिक्रमण विभागाकडून टाकला जाणार आहे. अशा सर्व पक्या अतिक्रमणधारकांना संबंधित विभागाकडून नोटीसा दिला जाणार आहे. शुक्रवारी सकाळपासून पाथर्डी नगरपरिषदेचे मुख्य अधिकारी संतोष लांडगे यांनी उर्दू शाळा,चिंचपूररोड,नाईक चौक, कोरडगाव चौक, अजंठा चौक व जुनी नगरपरिषद या परिसरातील छोटे मोठे व्यवसाय करणारे पुन्हा रस्त्यावर येत असल्याने त्यांना तात्काळ पोलीस व नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकाकडून हटवण्यात आले. यापुढे कोणी अतिक्रमण करून प्रशासनाला वेठीस धरत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केला आहे.
पुढील आठवड्यामध्ये मोठ्या स्वरूपात अतिक्रमणाची कारवाई होणार असल्याने पोलीस दलाकडे मोठा पोलीस बंदोबस्त मागितला गेला आहे . राज्यभरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असल्याने या मोहिमेला वळ मिळत आहे .पाथर्डी शहरातील जिल्हा परिषदेची मोठी जागा असून त्यावर शॉपिंग कॉम्प्लेक्स होण्याची मागणी आता छोट्या मोठ्या व्यवसायिकांकडून होत असून त्यामध्ये जिल्हा परिषदेने लक्ष घालण्याची गरज आहे.