दादापाटील राजळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला

दादापाटील राजळे महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण: 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दादापाटील राजळे महाविद्यालयात डॉ .बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला ५ फेबुवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत संपन्न झाली.

या व्याख्यानमालेमध्ये प्रा.ह. भ. प. संभाजी महाराज दरोडे,डॉ.बाबुराव उपाध्ये व श्री सुरेंद्र गुजराथी यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.या व्याख्यानमालेचे उद्घाटन ५ फेब्रुवारी रोजी प्रा. ह. भ. प.संभाजी महाराज दरोडे श्रीगोंदा यांनी केले. यावेळेस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . आर.जे. टेमकर , कार्यालयीन अधीक्षक विक्रम राजळे,कला शाखाप्रमुख डॉ.एम .एस .तांबोळी, संस्थेचे मार्गदर्शक भास्करराव गोरे, नॅक समन्वयक डॉ. राजू घोलप, ग्रंथपाल डॉ. राजू घुले ,प्रा.डॉ. जी. बी.लवांडे प्रा. चंद्रकांत पानसरे, केंद्र कार्यवाह डॉ.जालिंदर कानडे, प्रा. अंजूम शेख व डॉ. निर्मला काकडे उपस्थित होते

उद्घाटन प्रसंगी ह .भ. प . संभाजी महाराज दरोडे श्रीगोंदा यांनी अध्यात्म आणि विज्ञान या विषयावर व्याख्यान दिले.६ फेब्रुवारीरोजी प्रा. डॉ.बाबुराव उपाध्ये श्रीरामपूर यांनी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार या विषयावर व्याख्यान दिले. त्यानंतर १० फेबुवारी रोजी सुरेंद्र गुजराती संगमनेर यांनी नाट्य दर्पण भाग -२ या विषयावर एकपात्री नाटक सादर केले .एकाच व्यक्तीने कोणताही विषय रंगमंचावरून अभिनयासह सादर करणे.त्यांनी शंकर पाटील यांच्या धिंड या कथेतील कथानक एकपात्री प्रयोगाने सादर केले. धिंड कथेतील ग्रामीण भागातील लोकांची दवंडी पिटून केलेला दारूबंदीचा निषेध ! एखादा व्यक्ती व्यसनाधीन होऊन कसा मोडून काढतो, त्याची गावकरी मंडळी गाढवावरून कशी धिंड काढतात, याचे वास्तव चित्रण अनेक संवादातून, अभिनयातून विद्यार्थ्यासमोर हुबेहूब उभे केले.

या तीन दिवसीय डॉ .बाबासाहेब जयकर व्याख्यानमालीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. जे. टेमकर, महाविद्यालयाचे मार्गदर्शक श्री भास्कर गोरे,कार्यालयीन अधीक्षक श्री. विक्रम राजळे,,कला शाखाप्रमुख डॉ. एम. एस. तांबोळी, डॉ. राजू घोलप, डॉ. राजू घुले, डॉ .गंगाधर लवांडे, प्रा. चंद्रकांत पानसरे, प्रा. अंजुम सय्यद, प्रा.असलम शेख उपस्थित होते.

व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन डॉ. निर्मला काकडे यांनी केले तर या कार्यक्रमाचे संयोजन बहिःशाल शिक्षण मंडळाचे केंद्र कार्यवाह डॉ. जालिंदर कानडे यांनी केले .

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें