मोहरी गाव कायमचे पाणीटंचाई मुक्त करू- आमदार मोनिका राजळे

मोहरी गाव कायमचे पाणीटंचाई मुक्त करू- आमदार मोनिका राजळे

मोहरी येथे रस्त्याच्या व कामाचे भूमिपूजन

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
उन्हाळ्याची चाहूल लागताच तालुक्यात पहिला टँकर हा मोहरी गावाला सुरू होतो.पाण्याच्या टँकर कायमचा बंद करण्यासाठी अमरापूर – माळी बाभुळगाव पाणीपुरवठा योजनेमध्ये मोहरी गावाचा समावेश होण्यासाठी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून मोहरी गाव कायमचे टंचाई मुक्त करू, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
तालुक्यातील मोहरी येथे रानमळा भागातील रस्त्याचे खडीकरण,डांबरीकरण व नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजळे यांच्या हस्ते संपन्न झाले.यावेळी त्या बोलत होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच आशा वाल्हेकर,पं.सं.सदस्य सुनील ओव्हाळ,अभियंता वसंत बडे,संजय नरोटे,सुनील नरोटे,पोपट नरोटे,महेंद्र राजगुरू,विठ्ठल ठोंबरे,अण्णा मोहिते,अशोक ठोंबरे,कोंडीराम नरोटे,अश्रू वाघमोडे,साहेबराव नरोटे,भाऊसाहेब सुसलादे,दशरथ नरोटे,रावसाहेब ठोंबरे,तुकाराम डोईफोडे,नवनाथ नरोटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलतांना आ.राजळे म्हणाल्या की,राजळे कुटुंबाच्या अत्यंत जवळचे गाव म्हणून मोहरी गावाची ओळख आहे.पावसाची सरासरी कमी झाल्यानंतर मागील काही वर्षात या ठिकाणी पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.मात्र अमरापूर – माळी बाभुळगाव या पाणीपुरवठा योजनेमध्ये मोहरी गावाचा समावेश होण्यासाठी निश्चितच तातडीने पाठपुरावा करू.गावातील शिष्टमंडळाला घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याकडे प्राधान्यांनी बैठक लावून गाव टँकर मुक्त करण्यासाठी पाठपुरावा करू.या भागातील पाझर तलावांची गळती रोखण्यासाठी व उंची वाढवण्यासाठी निधी देणार असल्याचे जाहीर केले.यासह धनगर समाजासाठी सुरू केलेल्या शासनाच्या अहिल्याबाई घरकुल योजनेमधून जास्तीत जास्त घरकुले मंजूर करण्यासाठी देखील आपण प्रयत्न करणार असल्याचे आमदार राजळे यांनी सांगितले.

पदाधिकाऱ्यांच्या मनाचा मोठेपण….

या गावातील बहुतांश सरपंच याच भागातील झाले आहेत.मात्र तरी देखील त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवत गावातील इतर भागाचा विकास अगोदर केला व सर्वात उशिराने त्यांनी स्वतः राहत असलेल्या रानमळा या भागातील पुल व रस्त्याच्या कामाची मागणी केली.असे सांगत गावातील सर्व माजी सरपंच यांचे कौतुक केले.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें