शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या काव्यलेखन स्पर्धेचा निकाल जाहीर

पाथर्डी दि 06 फेब्रुवारी 2025

येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने संमेलनानिमित्त घेण्यात आलेल्या काव्यलेखन स्पर्धेमध्ये सौ.शितल बाळासाहेब डफळ यांनी प्रथम, सचिन चव्हाण यांनी द्वितीय तर दत्तात्रय खामकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला असून उर्मिला गायकवाड, ओंकार उदारे, प्रबोधिनी पठाडे यांना उत्तेजनार्थ  जाहीर करण्यात आले असल्याची अशी माहिती राज्य संघटक प्रा. डॉ.अशोक कानडे यांनी दिली.

कथालेखन स्पर्धेमध्ये विनय पिंपरकर यांनी प्रथम, भाऊसाहेब साहेबराव गवळी यांनी द्वितीय तर कु.दुर्गा विजय कवडे हिने तृतीय क्रमांक मिळवला असून उत्तेजनार्थ म्हणून सुनीता पालवे यांना पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत चंद्रजीत मोरे प्रथम, स्वाती पुरी द्वितीय तर समृद्धी संतोष सुर्वे यांना तृतीय क्रमांक जाहीर करण्यात आला आहे.

रविवार दिनांक 9 फेब्रुवारी रोजी दुपारी महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ व शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने होत असलेल्या सोळाव्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांच्या शुभहस्ते संमेलनामध्ये सदर पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

तरी या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन स्वागत अध्यक्ष संपत दादा बारस्कर, कवयित्री शर्मिला गोसावी कवी मारुती सावंत कार्यवाह भारत गाडेकर यांनी केले आहे

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें