प्रसाद गुंजाळ तबला विशारद प्रथम परीक्षा उत्तीर्ण
अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळातर्फे घेण्यात आलेल्या नोव्हेंबर २०२४ या सत्रातील विशारद प्रथम तबला परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये मिरी येथील अष्टविनायक संगीत विद्यालयातील सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रसाद विजय गुंजाळ हा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला आहे.
संगीत क्षेत्रात अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रसाद गुंजाळ याचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होत आहे.
त्याला अष्टविनायक विद्यालयाचे संचालक प्रा.भैरवनाथ जरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.