पारेवाडी येथे कृषि कृषीतज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्र संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या विळद घाट, अहिल्यानगर येथील कृषी महाविद्यालयाच्या कृषी कन्यांनी पाथर्डी तालुक्यातील पारेवाडी येथे शेतकरी चर्चासत्राचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.व्हि.एस.निकम हे होते तर प्रमुख मान्यवर म्हणून पारेवडीचे सरपंच राहुल शिंदे,पारेवाडीचे कृषी सहाय्यक जयश्री मुंजाळ, सिंजेटा कंपनीचे प्रशिक्षक गणेश कारंडे आदी मान्यवर उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून सहाय्यक प्राध्यापिका डॉ.डि.पी.मावळे व डॉ.बि.व्ही.रोंगे उपस्थित होते.डॉ.डि.पी.मावळे यांनी मृदा व जलसंधारणाचे शेतीतील महत्त्व तसेच डॉ.बि.व्ही.रोंगे यांनी दुग्धजन्य पदार्थ निर्मिती तंत्रज्ञान या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी सहाय्यक जयश्री मुंजाळ यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.शेतकरी चर्चा सत्रासाठी कृषीकन्यांना प्राचार्य डॉ.एम.बी.धोंडे, कार्यक्रम समन्वयक डॉ.एस.बी.राऊत, कार्यक्रम अधिकारी प्रा.के.एस. दांगडे, प्रा.बी.व्ही रोंगे, प्रा.के.बी.मोरे, प्रा.आघाव,प्रा.जाधव, प्रा.ठोंबरे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषिकन्या मेघा वाघ, मृणाल साळवे,नमिता शेळके यांनी परिश्रम घेतले.