स्थानिक संस्थांच्या निवडणुका लांबणीवर
ओबीसी आरक्षण प्रकरणाची आज होणारी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी आता २५ फेब्रुवारीला होणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात बऱ्याच कालावधीनंतर सुनावणी झाली.आज थोड्या वेळासाठी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण ऐकले असून सविस्तर युक्तिवादासाठी २५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे.
राज्य सरकार आणि याचिकाकर्ते या दोघांच्याही वतीने साधारणपणे दीड ते दोन तासात या प्रकरणाचा युक्तिवाद संपेल असे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यामुळे येत्या २५ फेब्रुवारीला हे प्रकरण प्राधान्यक्रमावर ठेवू असे कोर्टाने सांगितले आहे.
ओबीसी आरक्षणाचा विषय आता वादाचा उरलेला नसून प्रभाग रचनेबद्दल काही वाद आहेत व ते देखील सरकारच्या इच्छाशक्तीने सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या २५ तारखेस सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन निवडणुकीची स्थगिती उठविल्यास लगेचच पुढील दोन महिन्यात म्हणजे एप्रिल-मे मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची दाट शक्यता आहे.
या निवडणुकांच्या भविष्यासाठी 25 फेब्रुवारी ही तारीख अत्यंत महत्त्वाची ठरणार