मिरी परिसरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
मिरी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.मिरी येथे जिल्हा परिषद शाळा,माध्यमिक विद्यालय,सेवा संस्था तसेच कानिफनाथ चौक येथे विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी विविध गुणदर्शन स्पर्धेतील विजयी स्पर्धक विद्यार्थ्यांना मान्यवरांना हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.यावेळी अनेक विद्यार्थ्यांची भाषणे व नृत्याविष्कार झाले.
तसेच छत्रपती श्री शिवाजी महाराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये देखील प्राचार्य जी.व्ही.ढोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सुनंदा गवळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच मिरी सेवा संस्थेचे ध्वजारोहण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विविध ठिकाणी सरपंच सुनंदा गवळी, माजी पंचायत समिती सदस्य राहुल गवळी,उपसरपंच संजय शिंदे,प्राथमिक शाळा स्कूल कमिटीचे अध्यक्ष सुभाष गवळी,माध्यमिक विद्यालय स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य कारभारी गवळी,माणिकराव गवळी,माजी प्राचार्य नरवडे सर,भनगे सर व दाणे सर,ग्रामपंचायत सदस्य जालिंदर गवळी,भागीनाथ गवळी,परशुराम गवळी,अशोक शेळके,पत्रकार सचिन नन्नवरे,सोमनाथ धरम,विक्रम वाघ,पोलीस कर्मचारी पोपट आव्हाड,विजय भिंगारदिवे यांच्यासह प्राचार्य व्हि.जी.ढोले, मुख्याध्यापक क्षीरसागर सर यांच्यासह सर्व शिक्षक वृंद,विद्यार्थी,पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.