श्रम संस्कार शिबिर युवकांसाठी महत्त्वाचे-विश्वस्त धरमचंद गुगळे

श्रम संस्कार शिबिर युवकांसाठी महत्त्वाचे-विश्वस्त धरमचंद गुगळे

राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर संपन्न

(राजेंद्र चव्हाण,पाथर्डी प्रतिनिधी)

पाथर्डी येथील श्री आनंद कॉलेजच्या वतीने मोहटादेवी येथे सात दिवसाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबिराचे आयोजन १६ जानेवारी ते २२ जानेवारी या काळात करण्यात आले होते. यावेळी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे विश्वस्त श्री धरमचंदजी गुगळे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. ते म्हणाले की, युवक हा देशाचा कणा असतो, त्यांच्यावर वेगवेगळ्या वयात वेगवेगळे संस्कार होणे गरजेचे असते. त्यातीलच एक श्रम संस्कार होय.यावेळी प्राचार्य डॉ. शेषराव पवार, श्री. अरुण दहिफळे माजी विश्वस्त जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट मोहटे, श्री. महेंद्र शिरसाट यांचे ही भाषणे झाली.

या वर्षी युथ फॉर माय भारत या संकल्पनेवर आधारित शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात विविध विषयाला अनुसरून उपक्रम राबवण्यात आले. सशक्त भारत निर्माण करण्यासाठी युवकांची भुमिका, रस्ता सुरक्षा जनजागृती रॅली, प्लास्टिक मुक्त अभियान, महिला सबलीकरण, डिजिटल साक्षरता, जलसंवर्धन या विषयावर व्याख्याने पथनाट्य, रॅली आयोजित करण्यात आले होते.

डॉ. इस्माईल शेख, डॉ.जयश्री खेडकर, प्रा.अनिता पावसे, प्रा.मनीषा सानप, प्रा.अश्विनी थोरात व स्वयंसेवक विद्यार्थ्यांकडून शिबिर काळात विविध उपक्रम राबविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी डॉ.जगन्नाथ बरशिले, डॉ.मुक्तार शेख, डॉ.नितीन ढूमने, डॉ.भाऊसाहेब घोरपडे, डॉ.विकास गाडे, डॉ.अनिल गंभिरे, डॉ.धीरज भावसार, डॉ.अशोक वैद्य, डॉ.प्रतिक नागवडे, डॉ.अजिंक्य भोर्डे, प्रा.सूर्यकांत काळोखे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें