लेखी आश्वासनानंतर वंचितचे भ्रष्टाचार निषेधार्थ उपोषण तात्पुरते स्थगीत

लेखी आश्वासनानंतर वंचितचे भ्रष्टाचार निषेधार्थ उपोषण तात्पुरते स्थगीत

राजेंद्र चव्हाण, पाथर्डी प्रतिनिधी: 

पाथर्डी पंचायत समितीतील गलथान व भ्रष्टाचारी कारभाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने सुरु केलेले उपोषण दि.२४ जानेवारी रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

१३ जानेवारी रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाथर्डी पंचायत समितीच्या गलथान व भ्रष्टाचारी कारभाराच्या विरोधात राष्ट्रीय सदस्य आणि प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व शेख प्यारेलालभाई यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले होते.

प्रा.किसन चव्हाण यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या व म्हणाले की, वंचित बहुजन आघाडीने गेल्या १२ दिवसांपूर्वी पंचायत समितीच्या गलथान कारभाराबाबत लेखी निवेदन दिले होते, त्याची कोणतीही प्रशासनाने दखल घेतली नाही.पंचायत समिती कार्यालयात किती ढिसाळ कारभार चालतो, याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. निवेदनात दिलेले प्रमुख विषयाबाबत त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र करुन २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन व त्या पुढे जोपर्यंत प्रलंबित प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत सुरू ठेवण्यात येईल असा इशारा दिला होता. २४ जानेवारी रोजी याची गंभीर दखल घेवून गटविकास अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले आहे.या

आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जाधव, आकाश ठोंबे, बालाजी फुंदे, तात्यासाहेब लोढे, बाळासाहेब ठोंबे, भिमराव आंधळे, सागर भोसले, भालेराव महाराज, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम साळवे, कल्याण घुले, देवूबाई साळवे, साहेबराव कुसळकर, चांगदेव कुसळकर, डॉ.संजय धनवडे, भिमराज शिंदे, आबांदास वाघमारे, रावसाहेब माळी, भिमराज शिंदे, संजय मगर, तालुका महिला उपाध्यक्ष मिनाताई शिंदे, रेऊबाई साळवे, सुनिता मगर व इतर सामाजिक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें