पाथर्डीत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व पोलीस कर्मचारी स्व.संजय अकोलकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भजनसंध्या कार्यक्रम संपन्न

पाथर्डीत दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची जयंती व पोलीस कर्मचारी स्व.संजय अकोलकर यांच्या पुण्यतिथी निमित्त भजनसंध्या कार्यक्रम संपन्न


प्रा.राजेंद्र चव्हाण (पाथर्डी शहर प्रतिनिधी)

शहरातील मुंडेनगर येथे दिवंगत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची ९९ वी जयंती व पोलीस कर्मचारी स्व.अकोलकर यांची पुण्यतिथी निमित्त भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

स्व. हेड कॉन्स्टेबल संजय अकोलकर यांचे आई-वडील, भाऊ, पत्नी यांच्या वडिलोपार्जित घरचे वातावरण भाविक, धार्मिक, अध्यात्मिकितेचे आहे. ते दरवर्षी पाथर्डी तालुक्यातील करंजी या ठिकाणी दत्त जयंती,आषाढी एकादशी, संकष्ट चतुर्थीचे औचित्य साधून भजनाचे कार्यक्रम करतात. त्याच अनुषंगाने पाथर्डी येथे राहत्या घरी श्रीमती शोभा अकोलकर यांनी भजन संध्येचा कार्यक्रम आयोजित केला.

श्रीमती अकोलकर ह्या शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा महिला सह संपर्कप्रमुख असून दिवंगत शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरीत होऊन सामाजिक कार्य करत आहेत.म्हणूनच स्व.ठाकरे यांच्या जयंतीचे व स्व.अकोलकर यांच्या पुण्यतिथि चे औचित्य साधून त्यांनी पाथर्डी येथील श्री संत भाऊ-बाबा भजनी मंडळाचा भजनांचा उत्कृष्ट कार्यक्रम घडवून आणला.

दूलेचांदगाव येथील ज्येष्ठ गायनाचार्य छबू अण्णा वाघ, बाबा जायभाये तसेच सौ.दुर्गा नागरे यांनी आपल्या सुमधुर गायनानी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांना तबल्याची साथसंगत राजेंद्र चव्हाण तर हार्मोनियमची साथ एकनाथ मारेकर यांनी दिली.

या कार्यक्रमात अरुण दहिफळे, पोपट दहिफळे, पांडुरंग बांगर, रमेश घोडके, शोभा अकोलकर, सुनिता ढोले, कल्याण पोंधे, प्रमोद ढोले, मीराताई क्षिरसागर, मिराताई मर्दाने, सौ. देवडे यांनी विविध अभंग व गवळण गाऊन स्व.बाळासाहेब ठाकरे आणि स्व.अकोलकर यांना आदरांजली वाहिली.

विज्ञापन बॉक्स (विज्ञापन देने के लिए संपर्क करें)

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

क्या आपको लगता है कि बॉलीवुड ड्रग्स केस में और भी कई बड़े सितारों के नाम सामने आएंगे?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें